उपाययोजनांसाठी बैठका होऊनही शहरात वाहतूक कोंडी कायम

| उरण । वार्ताहर ।

उरण शहरात वाहतूक कोंडीचा सामना जनतेला करावा लागत आहे. शहर व परिसराचा विस्तार वाढत असून सिडकोच्या माध्यमातून नव्याने निर्माण होणार्‍या वसाहतींमुळे शहराचा अधिक विस्तार होणार आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्याने शहरातील प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका व एसटी स्टँड चारफाटा येथील वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. या वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी नगरपालिका व वाहतूक विभागाच्या गेल्या अनेक वर्षांत बैठका होऊन निर्णयही घेण्यात आलेले आहेत. मात्र, या उपाययोजना कागदावरच राहिल्याने उरणकरांना मात्र नित्याच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अधिकच अरुंद झाले आहेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या कडेला लागणार्‍या हातगाडयांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडली आहे. वाढत्या शहरामुळे खरेदीसाठी येणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था कमी प्रमाणात आहे. असे असले तरी या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत नाही. अनेक वाहन चालक रस्त्यातच वाहने उभी करून दुकानात खरेदी करण्यासाठी जातात असे चित्र नेहमीच शहरात पाहावयास मिळते.

शहरात सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वैष्णवी हॉटेल, कामगार वसाहत व राजपाल नाका या ठिकाणी होत आहे. नगरपालिकेची स्वतःची पार्किंगची सोय नाही. त्यामुळेच वाहने कुठे उभी करावयाची असा सवाल वाहनचालक करीत आहेत. यासाठी नगरपालिकेने प्रथम वाहन पार्किंगची सोय करावी. त्यानंतरच काहीअंशी तरी वाहतूक कोंडी कमी होईल असे बोलले जात आहे.

Support authors and subscribe to content

This is premium stuff. Subscribe to read the entire article.

Subscribe

Gain access to all our Premium contents.
More than 100+ articles.

Buy Article

Unlock this article and gain permanent access to read it.
Exit mobile version