चाळींवर पाडला हातोडा; प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट
| पनवेल | वार्ताहर |
शेतकऱ्यांचा नैनाला विरोध होत आहे, असे असले तरीदेखील नैनाने व्यवस्थापनाने आपली तोडक कारवाई सुरू ठेवली आहे. दि.18 रोजी हरिग्राम जवळील विजयनगर येथील चाळींवर नैनाचा हातोडा पडला. त्यामुळे येथील काही चाळी जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
तालुक्यातील 23 गावातील नैना प्रकल्पाला शेतकरी व ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. या विरोधात वेळोवेळी प्रचंड मोर्चे, आंदोलने, सभा घेण्यात आल्या आहेत. नैना रद्द करण्याची मागणी आजही करण्यात येत आहे. नैनाने तोडक कारवाई थांबवावी यासाठी निवेदन देखील देण्यात आले आहे. मात्र, तरी देखील नैनाने कारवाई थांबवलेली नाही. यापूर्वी देखील अनेक ठिकाणी नैनाने कारवाई केली आहे. सुरू असलेल्या कारवाईबाबत शेतकरी पुढील भूमिका ठरवण्याच्या तयारीत आहेत.