| आगरदांडा | प्रतिनिधी |
जीवनात यश मिळावावचे असेल तर प्रत्येकांनी अथक परिश्रम घेऊन यश प्राप्त करावे. गुणवत्तेची कास धरावी, जेणेकरून जीवनात आपल्याला उचित ध्येय गाठता येते. आपले आयुष्य जगत असताना नेहमी दुसऱ्याचा आदर करावा, जेणेकरुन भविष्यात आपण देखील मोठे अधिकारी बनु शकता. यासाठी जिद्द, श्रम व कसोटी महत्वाची असल्याचे प्रतिपादन कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राकेश पाटील यांनी मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दालनात पदोन्नती शुभेच्छा कार्यक्रमावेळी बोलत होते.
मुरूड-जंजिरा नगरपरिषदेचे लिपिक मनोज पुलेकर यांना आरोग्य निरीक्षक ही पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कामगार संघटनेच्यावतीने गौरवण्यात आले. यावेळी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी-परेश कुंभार, मनोज पुलेकर, नंदकुमार आंबेतकर, कपिल वेहेले, गजानन भुसाने, संदीप कमाने, स्वप्नील भावसार, जय भिसे, प्रज्वल गुरव, राजु पाटील, अनिकेत भोसले, प्रशांत दिवेकर, नरेंद्र नांदगांवकर, सुदेश माळी, ललीत जैन, सतेज निमकर, पल्लवी डोंगरीकर, अभिजित कारभारी, सतिश जंजिरकर, मंगेश गुरव, ओंकार पोतदार, जयेश चोडणेकर, रुपेश भाटकर, मितेश माळी, संदिप कमाने आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.