शहर बचाव समितीचा एल्गार
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील समस्या सोडविण्यास नगरपरिषद प्रशासन अपयश आले तसेच त्यांना विचारलेल्या प्रश्नाबाबत समाधानकारक उपाययोजना व उत्तरे न दिल्यामुळे कर्जत शहर बचाव समितीच्यावतीने 16 डिसेंबर 2024 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे असे निवेदन कर्जत नगरपरिषद प्रशासन देण्यात आले.
कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने 25 सप्टेंबर 2024 रोजी नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये जी माहिती व समस्या शहर बचाव समितीच्यावतीने मांडण्यात आल्या होत्या.
तसेच दैनंदिन व्यवहारातल्या व आपल्याकडून सहज सुटणार्या होत्या. 28 सप्टेंबरपर्यंत त्याची पूर्तता करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु आपल्याकडून त्याची काही पूर्तता झाली नाही. तसेच दिलेल्या निवेदनाबाबत मागण्यांबाबत कुठली ठोस समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत,असा आरोप समितीने केला आहे.
24 ऑक्टोबर 2024 रोजी नगरपरिषद प्रशासनास निवेदन तसेच 28 ऑक्टोबर 2024 रोजी बैठकीत नगर परिषद प्रशासनासमोर मांडणी केलेल्या सर्व समस्यांची निवारण 30 नोव्हेंबर रोजी पर्यंत कराव्या त अन्यथा आम्ही नागरिक यांना जास्त आपल्याविरुद्ध बेमुदत साखळी उपोषण, आंदोलन डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. परंतु दिलेल्या मुदतीत सुद्धा नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्यांचे निवारण झाली नाही.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीचे आश्वासन दिले होते त्याचीसुद्धा काही पूर्तता केलेली नाही तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांचे नागरिकांच्या समस्या सोडवण्या कामे कुठल्याच प्रकारचे गांभीर्य दिसलेले नाही.
कर्जत नगर परिषदेमध्ये कर्जत शहर बचाव समितीचे कैलास मोरे, सोमनाथ पालकर, शेखर सावंत, सतीश मुसळे, प्रशांत उगले, अॅड.भावना पवार, प्रमिला पाटील, संतोष सावंत, मल्हारी माने, प्रिया नागवडे, अनंता आंग्रे, दिनेश रणदिवे,भीमराव गाडे, गणेश जंगम, सुरेश खानविलकर, जयवंत म्हसे, विजय हरिश्चंद्र, प्रभाकर करंजकर, सूर्यकांत भानुसगरे, अजय वर्धावे, मुजिब मुल्ला, सुनील जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनास निवेदन दिले आहे.