भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्याचा निर्धार

। पनवेल । प्रतिनिधी ।
लोकपाल व लोकायुक्त यांचा सक्षम कायदा करून भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल,  यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरामध्ये व तालुक्यात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉक्टर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर बगाडे यांनी केले.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची जिल्हा बैठक घेण्यात आली.त्यास जिल्ह्यातील सुमारे पन्नास प्रमुख प्रतिनिधी हजर होते. यावेळी सभासद नोंदणी जिल्हाभरात करण्याचा संकल्प करण्यात आला.तसेच विविध कार्यक्रम आंदोलनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यात   प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक घेण्यात येणार आहे  तसेच तेथील कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ही शंकर बगाडे यांनी दिली.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्‍वस्त अल्लाउद्दीन शेख यांनी केले. बैठकीला पनवेल,उरण,खालापूर, कर्जत,पेण,श्रीवर्धन,मुरुड येथून कार्यकर्ते आले होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी अरविंद पाटील, संतोष ढोरे, किरण बाथम, नितीन जोशी, रुस्तम तारापूरवाला, संतोष पवार, राजेंद्र मढवी, सुभाष पाटील, विमल मुंडे, उज्वला सांगडे, करुणा मुकादम, सुनीता भगत, चंदा कातकरी, सुभाष जाधव, काशिनाथ खुडे, रामदास करकरे, शाळीग्राम वानखेडे, डॉ चॅम्पियन बेंडले, प्रकाश मुकादम, वृषाली दाढावकर, संजय मांजरेकर,जसपाल सिंग नेओल,वैभव तोडणकर, मीनाताई पालांडे, अर्चना पालांडे, अश्‍विनी पाटील, अरुणा पाटील, लहू तातरे, इसाक शेख, रंजना पाटील, तुळशीराम पाटील, रवींद्र पावणेकर, जयश्री गवळी, अब्दुलाई शेख, प्रवीण जठार, मारूती शेरकर या पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version