| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चेंढरे पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार प्रिया दत्ताराम ढवळे आहेत. त्यांचे पती दत्ता ढवळे हे सर्वांनाच परिचित आहेत. राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. दत्ता ढवळे हे नाव चेंढरेकरांना माहित नाही, असे होणार नाही. जनसामान्यांत रमणारी व्यक्ती म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. मदतीला धावणारे, सुख-दुखात हिरहीरीने सहभाग घेणारे म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती आहे. चेंढरेतील स्मशानभूमीसह पाण्याचा प्रश्न सोडविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. गावातील रस्ते, पाणी, विजेची सुविधा, घंटागाडी तसेच अन्य मूलभूत गरजा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.
उपसरपंच म्हणून असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक निर्णय गावकऱ्यांच्या हितासाठी घेतले आहेत. दत्ता ढवळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नी प्रिया ढवळे या सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. एक धाडसी नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामविकासाचा ध्यास घेऊन त्या पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवताना केवळ सत्ता मिळवण्याचा नव्हे, तर पंचायत समिती गणातील नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार प्रिया ढवळे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसेवा हीच त्यांची धारणा आहे. अनेक अडचणींवर मात करत, वेळप्रसंगी पदरमोड करुन गावाच्या विकासासाठी धडपड करणारे दाम्पत्य म्हणून प्रिया दत्ता ढवळे यांच्याकडे पाहिले जाते. संपूर्ण परिसराच्या कल्याणासाठी झटणारे एक नेतृत्व आहे. त्यांची कार्याची छाप चेंढरे पंचायत समिती मतदार संघात आजही कायम आहे माणसं जपणारे दांम्पत्य म्हणून प्रिया ढवळे व दत्ता ढवळे यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूकीच्या निमित्ताने ते घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. त्यांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांकडून जल्लोषात स्वागत केले जात आहे. त्यामुळे माणुसकी जपणारे, हाकेला धावणारे ढवळे यांना बहुमत मिळणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.








