देवश्री टेमकरची राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

| अलिबाग | प्रतिनिधी |

चेंढरे-अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालची विद्यार्थिनी  कु.देवश्री कुलदिप टेमकर हिची राज्यस्तरीय शालेय नेमबाजी
स्पर्धेसाठी  १० मीटर ओपन साईट एअर रायफल  क्रीडाप्रकारात निवड झाली आहे.

कु.देवश्री कुलदिप टेमकर चिंतामणराव केळकर विद्यायात  इयत्ता ६ वी इंग्रजी माध्यम शिकते. देवश्रीने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे  तिची  ठाणे येथे झालेल्या मुंबई विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या विभागीय स्पर्धेत तिने १० मीटर ओपन साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे तिची  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

Exit mobile version