। रेवदंडा । वार्ताहर ।
चौल पाचकळशी समाजाच्या नवनिर्माण पाचकळशी माळी समाजाच्या एकता कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कृषी पर्यटन व देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीच्या माध्यमातून दि. 26 एप्रिल रोजी अलिबाग तालुक्यातील शंभर शेतकर्यांनी मुरूड तालुक्यात नांदगाव श्री गणेश, दिवेआगर येथील सुवर्णगणेश, दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले हरिहरेश्वर दर्शन आदी ठिकाणी देवदर्शनाचा लाभ घेऊन रोहा येथील कृषी विज्ञान विद्यापीठास भेट दिली. या सहलीचे नेतृत्व चौल माळी समाज अध्यक्ष सुरेश घरत (कोटकर) यांच्यासह सदानंद पडते, नरेश म्हात्रे, दिलीप पडते, संतोष घरत, आशिष राऊत, अनंत घरत, किशोर घरत, सचिन घरत आदींनी केले होते.







