। पनवेल । वार्ताहर ।
जनावरांसाठी दफनभूमी, स्मशानभूमी विकसित करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी आयुक्ताकड़े केली आहे. स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, निरोगी पनवेल ठेवण्यासाठी आपल्या पालिक क्षेत्रात दफनभूमी, स्मशानभूमी असणे अत्यंत गरजेचे आहे. जनावरांच्या मृत्यू नंतर त्याचे प्रेत उघड्यावर टाकले जाते. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरून परिसरात रोगराई वाढत जाते. 2005 साली आलेल्या पुरामुळे हजारो जनावरे मृत पावली होती. त्यानंतर पसरलेल्या दुर्गंधीमुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हिंदू धर्मात प्राण्यांना दैवत मानले जाते. अशातच रोगराई, वृद्धापकाळाने किंवा दुर्घटना होऊन मृत पावलेल्या प्राण्यांना उघड्यावर टाकून दिले जाते. अशा मृत जनावरांकरिता दफनभूमी, स्मशानभूमी असणे आवश्यक आहे.
बैल, म्हैस असे प्राणी पुरताना तेव्हढाच मोठा खड्डा खणून त्यात अर्धा खड्डा मीठ टाकावे लागते. त्यामुळे कोणतीही दुर्गंधी पसरत नाही. त्यामुळे पालिका क्षेत्रात जनावरांना पुरण्यासाठी दफनभूमी, स्मशानभूमी असावी. ह्या उपक्रमामुळे निश्चित पालिकेचे नाव नोंदविले जाईल. अशी मागणी पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे यानी आयुक्ताकड़े केली आहे.