कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बीड जिल्हा परिषद विभागातील विकास कामांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उक्रुळ-चांधई-कडाव-तांबस – दहिवली-खांडपे- कोंदीवडे रस्त्याचे 5054.4 अंतर्गत सुमारे 3कोटी 52 लाख रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 2 कोटी 64 लाख रुपये खर्च करून खांडपे-सांडशी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे या रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा खांडपे व दहिवली या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी रायगड जिल्हा सल्लागार भरत भाई भगत, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, सह संपर्क प्रमुख पंकज पाटील, तालुका संघटक शिवराम बदे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, संभाजी जगताप, राजेश जाधव, नगरसेवक तसेच बीड जिल्हा परिषद विभागातील पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.