समाजकारणातूनच शेकापची विकासकामे – आ. जयंत पाटील

सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त वरसोलीत रक्तदान शिबीर
। अलिबाग । वार्ताहर ।

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणारी सर्व विकासकामे राजकारणातून नव्हे तर, समाजकारणातून करण्यात येतात, असे प्रतिपादन सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. ते वरसोली ग्रामपंचायत सदस्य, शेकाप कार्यकर्ते सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तबंध सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी बोलत होते.

या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून आ. जयंत पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, वरसोली सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, माजी सरपंच नलिनी बना, झिराड पोलीस ठाण्याचे पीआय राजीव पाटील, अलिबाग पोलीस ठाण्याचे पीआय सणस, ऋषिकांत डोंगरे, अलिबागच्या उपसभापती मीनल माळी, श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट वरसोली अध्यक्ष सुभाष भोबू, उपाध्यक्ष मनीष भोबे, कोळी समाजाचे पाटील महेश कोळी आदींसह रक्तबंध सामाजिक संस्था अध्यक्ष सिद्धांत कोळी, उपाध्यक्ष प्रज्ञेश झिटे, सहकारी हितेश भिवे, पारस मेस्त्री, मयूर म्हात्रे, पवन भगत, मयुरेश लोंडे, सनिल लोंडे, तन्वीश, अमेय, हितेन दळवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, पंच उपस्थित होते.

यावेळी आ. जयंत पाटील यांनी गामपंचायत सदस्य सुरेश घरत यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, गेली 25 वर्षे शेकापमध्ये निष्ठेने कार्यरत असून, त्यामध्ये गोरगरिबांची कामे, रस्ते, कोळी समाजाची कामे ते करीत आहेत. राजकारण बाजूला ठेवून सर्व कामे ते उत्तमरित्या करीत आहेत. या समुद्रकिनार्‍यावर बत्ती प्रकल्पासाठी आपण मंत्रालयात निवेदन दिले असून, लवकरच हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे यावेळी आ. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी साऊथ एशियन गेम्स 2022 मध्ये पदकांची लयलूट करणार्‍या शिवम गुंजाळ, देवदत्त पडवळ, प्रियेश मसाल, मल्हार गुंजाळ, अंश म्हात्रे, शुभम नखाते, वेदांत सुर्वे, स्नेहा मसाल, सृष्टी म्हामुणकर, लावण्या भगत, नम्रता चव्हाण, सना तुळपुळे, महिमा खंबीस आणि त्यांच्या प्रशिक्षक प्रियांका गुंजाळ यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, 200 जणांनी रक्तदान केले.

Exit mobile version