माथेरानमध्ये विकासकामे सुरू

मुख्याधिकारी भणगे यांच्याकडून पाहणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा पर्यावरण पूरक विकास करून माथेरान हे युनिक पर्यटनस्थळ करण्यासाठी नगरपालिकेने विविध विकासकामे सुरू केली असून नवीनच रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांनी विकासकामे सुरू असलेल्या स्थळाची पाहणी केली. माथेरान मधील पॉईंट्स आणि अंतर्गत रस्ते सुशोभीकरण करण्याची कामे सुरू झाली. ही सर्व कामे योग्य पद्धतीने होत आहेत की नाही ह्याची शहानिशा करून मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू होताच स्वतः प्रत्येक कामाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित कामांची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने माथेरान रेल्वे स्थानकापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या वन ट्री हिल पॉईंटला पायी चालत जाऊन कामाची पाहणी केली.

Exit mobile version