| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जतमधील छत्रपती शिवाजी महाराज नगर दहीवली येथील जुना वेणगाव रस्त्याचे काम ठराविक ठिकाणी गटार, साईडपट्टी न करता अपूर्ण काम करीत असल्याचे पत्र मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव गारवे यांना कर्जत प्रेस असोसिएशन वतीने देण्यात आले आहे. दहिवली भागातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जुना वेणगावकडे जाणारा रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र, गेली अनेक महिने बंद असून आतापर्यंत 80 टक्के रस्ता पूर्ण झालेला आहे. सदर रस्त्याचे काम एप्रिल 2023 मध्ये सुरू झालेले असून वेणगाव दिशेकडून दहीवलीपर्यंत ठराविक काही ठिकाणी अनधिकृत कामामुळे रस्ता वर्षभर केला गेला नाही. या रस्त्यावरील साईड पट्टी, गटारासाठी जागा न सोडता आहे त्या स्थितीत रस्ता करीत आहेत.
या रस्त्यात गटार, साईड पट्टी नसल्याने अनेक समस्य उद्भवू शकते. त्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यावर सदर भागात सांडपाण्याचा प्रश्न आणि इतर तांत्रिक अडचणी साठी उपाययोजना करणे कठीण होईल. संबधीत अधिकारी यांनी योग्य दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या बद्दल कर्जत नगरपरिषद चे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचेकडे कर्जत प्रेस असोसिएशन कडून मागणी करणारे निवेदन दिले आहेत.