नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये असलेल्या दहिवली भागातील विकासकामे अडखळून राहिली आहेत. त्यामुळे कर्जत शहरातील दहिवली भागातील नागरिकांनी दहिवली विचार मंच स्थापन केला आहे. या मंचाच्या माध्यमातून आ. महेंद्र थोरवे यांना निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले.
दहिवली भागातील समस्या सोडवण्या बरोबरच दहिवली गावासाठी पाण्याची साठवणूक टाकी बांधून देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. दहिवली गावातील समस्या सोडवण्याबाबत लक्ष घालून कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सूचना देतो आणि गावासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना आमदार थोरवे यांनी दिल्या. याप्रसंगी विकास चित्ते, मधुकर दादा सुर्वे, प्रवीण गांगल, शशांक शेट्टी, किरण देशुख, सुरेश गायकर, मंगेश म्हसे, कुणाल बर्वे, दिनश कडू आणि इंदिरानगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.