मावळमध्ये बारणेंकडून विकासशून्य कारभार- संजोग वाघेरे

। नेरळ । प्रतिनिधी ।

मावळमधील संसदरत्न म्हणून मिरवणारे खासदार यांनी दहा वर्षात कोणती कामे केली हे मी उमेदवार म्हणून विचारत नाही. तर मतदारसंघातील जनता विचारत असून साधे पाणी घरोघरी देऊ शकले नाहीत आणि त्यामुळे कर्जत तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रीरंग बारणे यांच्या कायर्र्काळात मावळ मतदारसंघात विकासशून्य कारभार असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मांडले. मावळ लोकसभा निवडणुकीचे दृष्टीने महाविकास आघाडीची उमरोली आणि नेरळ जिल्हा परिषद गटाची कार्यकर्ता आढावा बैठक डिकसळ येथील रोहित मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होती.

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हा प्रमुख नितीन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड. गोपाळ शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शंकर भुसारी, काँग्रेसचे दीनानाथ देशमुख तसेच उपजिल्हा प्रमुख दशरथ भगत, सुरेश गोमारे, माजी सभापती वासंती राणे, युवा सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश मोरे, काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॉ. संतोष सदावर्ते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Exit mobile version