श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर महागणपती क्षेत्रात संकष्टी चतुर्थीनिमित्ताने बुधवारी (दि.28) भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. श्रींचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची पहाटेपासूनच सुरुवात झाली होती. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हार, गावठी भाज्या, वाल चवळीच्या शेंगा, रानटी कंदमुळे, स्थानिक कुंभारानी बनविलेली मातीची भांडी, तसेच अन्य पदार्थांच्या विक्रीला ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले. उरण, पनवेल, पेण, नवी मुंबई येथील भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे गणपती देवस्थानतर्फे सांगण्यात आले.

The Review

Exit mobile version