| पेण | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस 22 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी हा वाढदिवस साजरा केला जाणार नाही, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संजय डंगर यांनी एका प्रसिद्ध पत्रकाने जाहीर केले आहे. धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस स्नेहसागर या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, दादांचे काका तथा ज्येष्ठ शेकाप नेते केशव (नाना) महादेव पाटील व मेहुणे माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद पाटील (पिंट्याशेठ) यांचे या वर्षाच्या काळातच आकस्मिक निधन झाले आहे. त्यामुळे दादांचा वाढदिवस उत्साहात व समारंभपूर्वक साजरा न करण्याचा निर्णय दादा व त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला आहे. दादांवर आपल्या सर्वांचे मनापासून प्रेम आहेच, ते कधीच कमी होणार नाही. तर ते अधिकच द्विगुणितच होईल, याची कल्पना आहेच. तरीदेखील सर्वांना नम्र विनंती आहे की, झालेल्या दुःखद घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दादांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करु नये. आपण जिथे आहात, तिथूनच शुभेच्छा चिंताव्या, असे आवाहन संजय डंगर यांनी केली आहे.