| पनवेल | वार्ताहर |
नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
वास्तविक पाहता, हेल्मेट घालणे हे दुचाकीस्वाराच्या फायद्याचे आहे. यामुळे कित्येकदा अपघातात प्राण वाचतात. असे असतानाही काही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई पनवेल शहर वाहतूक शाखेने केली आहे. यावेळी नो एंट्रीत प्रवेश करणे, चारचाकी वाहनांना काळ्या काचा, सीटबेल्ट, ट्रिपल शिट, अशी धडक मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी संजय नाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
विना हेल्मेट, सीटबेल्ट व काळ्या काचा वापरणे अशा नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.
संजय नाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतुक शाखा







