धनलक्ष्मी स्वयंमसायता बचत गट; राजमाता जिजाऊ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

। भाकरवड । वार्ताहर ।
भाकरवड येथील धनलक्ष्मी स्वयंम सायता महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन महिला सबलीकरण आथिर्क, सामाजिक, तसेंच व्यवहारिक दृष्टया सशक्त होताना दिसत आहेत. याचे सर्वं श्रेय जाते झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष चित्रा पाटील यांना चूल व मुलं सांभाळणार्‍या महिलाना एक स्टेज तयार करून आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढून विविध योजनांची माहिती देत सहभागी करण्याचे मोलाचे कार्य त्या करीत आहेत त्यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सन 2007 साली सुशिक्षित बेरोजगार महिला एकत्र येऊन एक जोड धंदा तयार केला. पोयनाड ग्रामपंचायत हद्दीत पोयनाड दीपावलीच्या दरम्यान नाक्यावर तयार चकली आणारसे व पीठ सरपंच शकुंतला काकडे यांच्या माध्यमातून दुकान लावण्यास परवानगी घेऊन तिथे ही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष चित्रा पाटील यांनी खारेपाट महोत्सव साजरा केला त्या महोत्सवात जवळ जवळ 50 हुन अधिक खारेपटातील महिला बचतगट यांनी सहभाग नोंदवला होता. या बचत गटांत उर्मिला पाटील, रुपाली पाटील, जयश्री पाटील, वैजयंती पाटील, सुवर्णा पाटील, समिता पाटील, नितिषा पाटील, पुष्पा पाटील, प्रीतम पाटील, मंदा पाटील, स्नेहल पाटील, ज्योती पाटील, प्रियांका पाटील, आरती पाटील यांचा अमित जगताप, एल बी पाटील, सुहास पाटील, महादेव जाधव, वैभव कुंभार, याच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ग्रीन फाउंडेशन काळभोर पुणेच्या वतीने राजमाता जिजाऊ महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Exit mobile version