रोईंग प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून देणारा धंनजय पांडे महाडचा

आशियाई क्रीडा स्पर्धा


| महाड | वार्ताहर|

चीन येथील होंगझोऊमध्ये आशियायी क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. रोईंग (नौकानयन ) प्रकारात रविवारी भारताला कांस्य पदक मिळाले आहे. या विजयी संघामध्ये महाडचा धनंजय (पिंट्या) उत्तम पांडे या खेळाडूचा समावेश असल्याने संपूर्ण रायगड जिल्हयातून त्याच्या कुंटूंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धनंजय पांडे हा गेली 12 वर्ष भारतीय सेनेत कार्यरत आहे. सध्या तो आपल्या सेनेतील सुभेदारपद सांभाळतांना रोईंग या क्रीडा प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. याआधी त्यांनी रोईंग प्रकारात राष्ट्रीय पदक र् मिळविले आहे. रोईंग स्पर्धेत भारत चीन दरम्यान अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघाला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. भारतीय संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

धंनजय आणि त्याच्या 8 सदस्यांनी अपार मेहनत घेत कांस्य पदक जिंकले. या संघात राजस्थानचे तीन, महाराष्ट्राचा एक आणि अन्य राज्याचे चार असे भारतीय संघाचे खेळाडू होते. महाडच्या विनायक हरि परांजपे विद्या मंदिरात धनंजय शिकला. धनंजय पांडे भारतीय सेनेत बॉईज म्हणून सेवेत गेला होता. लहानपणापासून त्याला खेळाची विशेषतः रोईंग या क्रीडा प्रकारची आवड होती. धनंजय पांडे बाबत महाड मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Exit mobile version