धनगर आंदोलक आक्रमक

| सोलापूर | प्रतिनिधी |

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या शेखर बंगाळे या आरक्षण आंदोलकाला मारहाण केल्याप्रकरणी धनगर समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. जालन्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध आंदोलन केले. दरम्यान, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाच्या तरुणास अमानुष मारहाण केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच, महसूल मंत्री विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस देणार असल्याची घोषणा करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेऊन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं आहे.

Exit mobile version