। रसायनी । वार्ताहर ।
कोकण आणि रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाड्या-वस्त्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून राज्यकर्त्यांनी फक्त समाजाचा मतदानापुरता वापर केला असून समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रवीण काकडे यांनी केला आहे. असे ते खालापूर (गोळेवाडी) येथील जनजागृती मेळाव्यात बोलत होते. धनागर समाजाच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघटना अहोरात्र मेहनत घेत आहे. समाजातील मुले मुली शिकल्या तर समाजाची शैक्षणिक प्रगतीबरोबर आर्थिक प्रगती ही होईल.
कोकणासह रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत तालुक्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांवर आजही रस्ता, वीज आणि पाण्याची सोय नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून एकीकडे 75 वर्ष पूर्ण झाल्याचे अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, धनगर समाजाचा आजही विकास झाला नसून शिक्षणापासून वंचित आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न आजही तसाच असून राज्यकर्त्यांनी फक्त धनगर समाजाचा मतापुरता वापर केला आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने समाजाने आतातरी शहाणे होऊन समाजाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. जेणेकरून राजकीय पक्षाला आपल्या समाजाची ताकद कळून ते आपली दखल घेतील, असेही आवाहन प्रवीण काकडे यांनी केले आहे.
यावेळी संतोष घाटे, प्रकाश उघडे, सुनील कोकळे, डॉ.राजाराम हुलवान, मारुती गोरड, अनंता हिरवे, आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, ओमकार कुचेकर, अरुणा दडस, किरण हिरवे, महादेव कारंडे, नथुराम ढेबे, बाळकृष्ण आखाडे, विठ्ठल जांगळे, नरेश आखाडे, गणेश बावदाने, मंगेश बावदाने, प्रकाश बुरगले, सतीश बंडगर, आशिष स्वामी, प्रफुल्ल जंगम, संजकुमार गोरड, सुरेश घाटे, महादेव घाटे आदि उपस्थित होते.







