जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
। खांब । वार्ताहर ।
भाले पहूर येथे संपन्न झालेल्या जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेत रोहा तालुक्यातील गावदेवी आदिवासीवाडी धानकान्हे हा संघ विजेता ठरला आहे. आदिवासी समाजातील तरूणांना कबड्डी खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तर अंतिम सामन्यात अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत गावदेवी धानकान्हे आदिवासीवाडी संघाने आमदेवळी सुधागड-पाली या संघाचा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकावले. गावदेवी धानकान्हे आदिवासीवाडी संघाच्या या सुयशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. तर या संघाने कबड्डी क्षेत्रात कायमच आपले वर्चस्व कायम राखून विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात पारितोषिके पटकावली आहेत.