अलिबाग ड्रीमरन स्पर्धेचे विजेते ठरले धीरज पाटील; महिला खुला गटात दर्शना पाटील यांची बाजी 

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते उदघाटन 

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

युवा शेकाप पुरस्कृत आणि बी यु प्रोडक्शन आयोजित ड्रीमरन मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते धीरज पाटील ठरले तर महिला खुला गटात दर्शना पाटील यांनी बाजी मारली.  स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि माजी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविला. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, सुयोग आंग्रे उपस्थित होते. स्पर्धेच्या पाच गटांमध्ये अलिबाग तालुक्यातील सुमारे 600 धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला. 14 वर्षाखालील आणि खुला गट या गटांमध्ये असणाऱ्या उपस्थिती बरोबरच 40 वर्षावरील महिला आणि पुरुषांनी ‘हम भी किसींसे कम नही’ असा इशारा देत मॅरेथॉनमध्ये धावून तरुणांना देखील लाजवले.


पुरूष खुला गटाच्या 10 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये धीरज पाटील यांनी प्रथम क्रमांक, वैभव पाटील द्वितीय, अक्षय पाटील तृतीय, अक्षय राणे चतुर्थ आणि राहुल कंदार यांनी पाचवा क्रमांक पटकावला. महिला खुला गटात दर्शना पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ कथा वाडकर द्वितीय, नेहा म्हात्रे तृतीय, पौर्णिमा म्हात्रे चतुर्थ आणि साक्षी मोहिते यांनी पाचवा क्रमांक पटकावला. 


14 वर्षाखालील मुलांच्या गटात मिहीर घरत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ स्मित भगत द्वितीय, अभिषेक पवार तृतीय, शौर्य तांबोले चतुर्थ आणि कैवल्य सुरेकर यांनी पाचवा क्रमांक पटकावला. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात भूमी म्हात्रे अव्वल ठरली. त्यापाठोपाठ वैष्णवी पाटील द्वितीय, इशा पाटील तृतीय, आर्या भोईर चतुर्थ आणि वैदेही जोशी यांनी पाचवा क्रमांक पटकावला. 

40 वर्षावरील पुरुषांच्या गटात मिलिंद शिलधनकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ संदीप भोईर द्वितीय, जीवन मोहिते तृतीय, संदीप मोहिते चतुर्थ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. 40 वर्षावरील महिला गटात कविता फुलगावकर यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ माधवी खराडे द्वितीय, ज्योती घरत तृतीय, तृप्ती म्हात्रे चतुर्थ आणि मीनल चिटणीस यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

Exit mobile version