| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेत जय बापदेव ढेपेवाडी रोहा संघाने विजेतेपद मिळवून कामगार चषक पटकावला. धामणसई रोहा संघ उपविजेता ठरला. म्हसोबा गावठाण, अलिबाग संघाने तृतीय तर वाघोबा क्रीडा मंडळ, खालापूर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू उमेश पारधी, ढेपेवाडी रोहा याला गौरविण्यात आले. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) थळतर्फे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सहयोगाने कामगार दिनाचे औचित्य साधून आरसीएफ क्रिडासंकुल कुरुळ येथे कामगार चषक आदिवासी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 आदिवासी संघ सहभागी झाले होते. या वेळी आरसीएफचे मुख्य महाव्यवस्थापक नितीन हिरडे, महाव्यवस्थापक संजीव हरळीकर, उपमहाव्यवस्थापक विनायक पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत म्हात्रे, सर्व कामगार संघटनाचे प्रतिनिधी, ऑफिसर्स असोसिएशन, जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे, क्रिडा अधिकारी सोनार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.