जडेजासंदर्भातील धोनीची भविष्यवाणी होतेय व्हायरल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या मैदानात कमालीची कामगिरी करताना दिसतो आहे. मोहाली कसोटीत बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कामगिरी करत त्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. या गोष्टीपेक्षा रविंद्र जडेजा सध्या धोनीने केलेल्या भविष्यवाणीमुळे चर्चेत आहे. 2010 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 21 वर्षीय रविंद्र जडेजाशिवाय भविष्यवाणी केली होती. भारतीय संघाला ज्या अष्टपैलू खेळाडूची गरज आहे ती उणीव भरुन काढण्याची धमक जडेजामध्ये आहे, असे तो म्हणाला होता. ज्यावेळी जडेजाने फार क्रिकेट खेळले नव्हते त्यावेळी धोनीनं तो भविष्यात स्टार असेल, असे भाकित केले होते. त्याची ही भविष्यवाणी आजच्या घडीला खरी ठरलीये. तो तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघासाठी उपयुक्त खेळाडू ठरत आहे.

भारतीय संघाशिवाय रविंद्र जडेजा बर्‍याच कालावधीपासून धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धोनीच्या सांगण्यावरुनच चेन्नई सुपर किंग्जेने यंदाच्या हंगामातील मेगा लिलावापूर्वी रविंद्र जडेजाला धोनीपेक्षा अधिक महत्त्व दिले. त्याच्यासाठी जी अधिक रक्कम मोजलीये यातून तो धोनीचा वारसदार असल्याचे संकेतच चेन्नईने दिले आहेत.दुखापतीमुळे गेल्या काही मालिकेला मुकलेल्या रविंद्र जडेजाने मोहाली कसोटीत तोर्‍यात कमबॅक केले. त्याने 175 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर 9 विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. डे नाईट कसोटी सामन्यातही त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.

Exit mobile version