मुख्य प्रशिक्षक निवडण्यात धोनीची भूमिका

बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. बीसीसीआय राहुल द्रविडच्या जागी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे आली होती. मात्र, अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. आता यासंबंधीची मोठी माहिती समोर येत आहे.

वास्तविक, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारताच्या मुख्य प्रशिक्षक निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयची पसंत न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आहेत. परंतु, त्यांनी ही ऑफर नाकारली. आता स्टीफन फ्लेमिंग यांना पटवण्याची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीवर आहे. स्टीफन फ्लेमिंगला पटवण्यात माही यशस्वी ठरला, तर ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्‍चित आहे. वास्तविक, स्टीफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील बॉन्डिंग खूपच मजबूत मानले जाते. दोघेही जवळपास 16 वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. स्टीफन फ्लेमिंग हे आयपीएल 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होते. यानंतर, आयपीएल 2009 पूर्वी त्यांना चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक बनवलं गेलं. तेव्हापासून ते या पदावर आहेत.

Exit mobile version