| उरण | वार्ताहर |
धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील भुयारी रस्त्यावर रविवारी (दि.17) दुपारी साडेतीनच्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला आहे.
जेएनपीए बंदर प्रशासनाने एनएच फोर बीच्या माध्यमातून जेएनपीए बंदर ते पळस्पे फाटा या महामार्गाची उभारणी केली आहे. या महामार्गावरील चिर्ले व धुतूम गाव परिसरातील नागरिकांना, प्रवासी वाहनांना सुखकर प्रवास होण्यासाठी एनएच फोर बीने चिर्ले व धुतूम गावाजवळ भुयारी रस्त्याची उभारणी केली आहे. परंतु, हा रस्ता प्रवासी वाहतुकीसाठी असताना, या रस्त्यावरून रात्री-अपरात्री अवजड वाहने प्रवास करत आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे. तरी नागरिकांच्या रहदारीच्या भुयारी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अन्यथा आंदोलन उभारणार असल्याचा इशारा धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिला आहे.






