आपत्कालीन सेवेसाठी 112 टोल फ्री नंबर डायल करा

। खोपोली । वार्ताहर ।
महामार्गावर नजर ठेवण्यासाठी आता खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीट मार्शलना नवीन मोटारसायकली देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या वाहनांचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे. खालापूर पोलीस ठाण्यात या नवीन वाहनांचे वितरण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेश पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. या बिट मार्शल वरून तात्काळ सेवा देण्याचे काम करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले. यावेळी सह्य पो नि कराड, खालापूर पनगराध्यक्ष राजेश पारठे, नगरसेवक संतोष जंगम, अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकरांसह ग्रामस्थ व सेवा देणारे पोलीस कर्मचारी स्वप्नील पानसरे व अन्य पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते

बीट मार्शलच्या माध्यमातून मदत मिळविण्यासाठी उपयोग होणार आहे अवघ्या नऊ मिनिटात घटनास्थळी पोहचण्यासाठी मशीन देण्यात आली असून फक्त टोल फ्री नंबर 112 डायल करा कंट्रोल रूम वरून तात्काळ लोकेशन बीट मार्शल ला मिळणार असून मागील वर्षात सर्वाधिक कॉल स्वीकारून सेवा दिल्याने प्रथम क्रमांक ही खालापूर पोलिसांनी पटकावला आहे त्यामुळे पुढील काळातही अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल

– अनिल विभूते, पोलीस निरीक्षक खालापूर
Exit mobile version