| पोयनाड | प्रतिनिधी |
पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर शुक्रवारी (दि.13) जैन युथ ग्रुप पोयनाडच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जैन प्रीमियर लीग पर्व पाचवे, बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धेत किशोर जैन यांच्या डायमंड डेअरडेव्हिल संघाने स्पर्धेच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पनेश जैन यांच्या धान्यम 9 संघाचा 11 धावांनी पराभव करत संपूर्ण स्पर्धेत चॅम्पियन्स ठरले आहेत. पोयनाड जैन युथ ग्रुप आयोजित जैन प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण सहा संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धा प्रथम लीग व त्यानंतर बाद फेरीनुसार खेळविण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रीत जैन याला मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज रिदेश जैन तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिक्षित जैन यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य मनोज जैन, विक्रम जैन, भरत जैन, किशोर जैन, जितेंद्र जैन, ऋषिकुमार जैन, अशोक जैन यांच्यासह जैन बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पोयनाड येथे आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील जैन बांधवांसाठी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन जैन युथ ग्रुपतर्फे करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील 20 संघांचा स्पर्धेत सहभाग असणार आहे. दोन दिवस पोयनाड येथे क्रिकेट खेळाचा मेळावा भरला असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







