जुलाब उलटीच्या साथीने नागरिक हैराण; आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुरुड-लक्ष्मीखार परिसरात अतिसाराची लागण होऊन उलटी-जुलाबामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही रुग्ण खासगी, तर काही रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित आरोग्य विभागाने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुरुड शहराला आंबोली धरणातून जलशुद्धीकरण यंत्रणातून पाणीपुरवठा केला जातो.असे असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील लक्ष्मीखार, दस्तुरी नाका भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील बरेच नागरिक उलट्या, जुलाब व थंडी तापाने त्रस्त झाले असून, खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नगरपरिषदेच्या संबंधित आरोग्य विभागाने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.