आचारसंहितेत अडकलेली ‘साडी’ रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळाली का?

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

लोकसभा निवडणुकीच्या आधी अंत्योदय रेशनकार्डधारकांना एक साडी भेट देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे वाटप थांबले होते. ते वाटप आता सुरु होणार आहे. दारिद्य्ररेषेखालील कार्डधारकांना शासनाकडून दरवर्षी एक साडी देण्याचे शासनाने सुरू केले.


पनवेल तालुक्यात दारिद्य्ररेषेखालील 6 हजार 663 कार्डधारकांना साडी वाटप करण्यात येणार आहे. पुरवठा विभागातर्फे रेशनिंग दुकानात साड्या पोहोच करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 1 हजार 734 साड्यांचे वाटप करण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे साडी वाटपाचे काम थांबवण्यात आले. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने राहिलेल्या साडी वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील दारिद्य्ररेषेखालील 6 हजार 663 कार्डधारकांना साडी मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी साड्यांचे वाटप करण्यात येत होते. मात्र, आचारसंहिता सुरू झाल्याने ते वाटप थांबवण्यात आले होते. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने लवकरच साडीवाटप सुरू होणार असल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आली. साडी वाटप करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे सांगण्यात आले.

Exit mobile version