मुरुडमध्ये दिलीप भोईर यांना पोलिसांनी रोखले?

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी शिंदे गटातील दिलीप भोईर यांनी गैरमार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र, तेथील स्थानिकांनी रोखल्याने हा प्रकार वेळीच आवरला गेला. मुरूड पोलिसांनी देखील त्यांना रोखले असल्याची माहिती समोर येत आहे.

दिलीप भोईर यांना अलिबागमधील जिल्हा न्यायालयाने मारहाण, जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. त्यांची कारागृहात रवानगी देखील झाली होती. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अटीशर्तीवर त्यांचा काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला. रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या निवडणूकीचे मतदान मंगळवारी सकाळपासून सुरू होते. मुरूडमध्ये देखील मतदानाचा उत्साह कायम दिसून आला. मात्र, शिंदे गटातील दिलीप भोईर यांनी मूरूडमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही गैरप्रकार केल्याची चर्चा सध्या मुरूडमध्ये सूरू आहे. त्यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी त्यांना रोखले. ही बाब मुरूड पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. मुरूड पोलिसांनी दिलीप भोईर यांना रोखून तंबी भरली. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version