| पनवेल | वार्ताहर |
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधील 300 लिटर डिझेल चोरुन नेल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जंगबहादूर सिंह हे पाली येथून कानपूर येथे जाण्यासाठी निघाले. त्यांनी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला. यावेळी डिझेलचा काटा खाली झालेला दिसला. त्यांनी ट्रकमधून खाली उतरून पाहणी केली असता ट्रकमधून डिझेल चोरून नेल्याची खात्री झाली. तीनशे लिटर डिझेल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.