। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील गव्हाण फाटा परिसरात उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गव्हाण फाटा परिसरात असलेल्या कंपन्यांच्या साईटमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या टाकीचे झाकण तोडून बेकायदेशीररित्या डिझेलची चोरी होत असल्याची माहिती वपोनि विजय कादबाने यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. महादेव दळवी, पो. हवा. नितीन वाघमारे, अविनाश गथंडे, महेश पाटील, अशोक राठोड, भगवान साळुंखे, संतोष मिसाळ आदींच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून आरोपी अहमद अब्दुल रहीम सय्यद (29) व त्याचा सहकारी अशोक म्हस्के (26) यांना जवळपास 37 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या डिझेलसह ताब्यात घेतले आहे.