शिवसेनेच्या अन् राष्ट्रवादीच्या सुनावणीत फरक: जयंत पाटील

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज राष्ट्रवादीच्या अपत्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यादरम्यान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आम्ही घटनेत बदल करत योग्य ती खबरदारी घेतलेली आहे असं विधान केलं आहे.

पुढे ते म्हणाले, आमची सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीमध्ये फरक आहे. आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत. आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे. समोरच्या बाजूने वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे. आज फेरसाक्ष पार पडेल का याबाबत थोड्या वेळात कळेल. शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणुन तटकरे यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. शरद पवार यांनी एकांगी कधीही निर्णय घेतला नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version