दिघोडे ग्रामपंचायतीने ऐसावत कंपनीला ठोकले टाळे

| उरण | वार्ताहर |

दिघोडे ग्रामपंचायत कडून ऐसावत ( फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक दिघोडे) या कंपनीला वारंवार नोटीसा बजावून ही सदर कंपनीने 2014-15 ते आजतागायत थकीत असलेला 1 कोटी 71 लाख 12 हजार 506 रकमेचा भरणा दिघोडे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जमा न केल्याने उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समीर वाठारकर व उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा शुक्रवारी (दि.16) उगारला असून, सरपंच किर्तिनिधी ठाकूर यांनी कंपनीला टाळे ठोकले आहे.

यावेळी उपसरपंच अभिजित पाटील, सदस्य अलंकार कोळी, कैलास म्हात्रे, संदेश पाटील, आरती कोळी, रेखा कोळी, अपेक्षा कासकर, उज्वला म्हात्रे, अपेक्षा पाटील, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील यांनी ऐसावत (फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक दिघोडे) या कंपनीचे विशाल अशोक चिले व्यवस्थापक, अजय प्रतापचंद्र कपूर इंजिनिअर तथा साईट इन्चार्ज, कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर कोळी, ग्रामस्थ नरहरी हरिश्चंद्र कोळी यांच्या उपस्थितीत टाळे ठोकले आहे. या कारवाईमुळे इतर कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.

Exit mobile version