रावे शाळेला इनरव्हीलतर्फे डिजिटल स्क्रीन

| हमरापूर | वार्ताहर |

इ लर्निंग द्वारा शाळेतील मुलांना शिकण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पेण आणि रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यांतील रावे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला डिजिटल स्क्रीन भेट देण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ़ पेणच्या प्रेसिडेंट तन्वी सागर हजारे यांच्या हस्ते डिजिटल स्क्रीनचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सरस्वती ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गुरुनाथ पाटील, अनिता पाटील, आशा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रेमा पाटील, एम.टी. सर, सुषमा पाटील, अनुसया म्हात्रे, सुगंधा म्हात्रे, हेमलता म्हात्रे, दिपक बांदल सर, हेमांगी मानकवळे तसेच रोटे, सुबोध जोशी, इनरव्हील क्लब सदस्या मुस्कान झटाम, श्‍वेता गावंड, वैशाली समेळ, निशा कीर्ती सावंत आदींसह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version