डिजिटल स्ट्राइकला सुरुवात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानवर आता डिजिटल स्ट्राइक सुरू झाला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे. बुधवारी (दि. 23) सायंकाळी झालेला बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा बंद करण्यासह इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते; आता भारताने पाकिस्तानच्या सोशल मीडियाबाबत मोठी कारवाई केली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएस बैठकीत पाकिस्तान विरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. देशाच्या आयटी मंत्रालयाने एक्स कंपनीला भारतातील पाकिस्तानी सरकारचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते. भारताने पाकिस्तानच्या अधिकृत X अकाउंटवर भारतात बंदी घातली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालया बाहेरील पोलीस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था पाकिस्तान आणि उच्चायुक्तालयाबाहेर वाढवली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आता सर्व बारिकेट झटवले आहेत. त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. अनेक लोक पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनेही करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवणे भारतातील पाकिस्तानच्या फेसबुक आणि youtube चॅनलवर बंदी घालणे, असे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. जेणेकरून पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास भाग पाडता येईल.