| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगडच्या रगरागिणी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय, पत्रकारीता आदी विविद क्षेत्रातील दिग्ज मान्यवरांकडून पाटील कुटुंबियांचे सोमवारी सांत्वन करण्यात आले. पेझारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील आदींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ देण्याचा प्रयत्न केला.
खा. अरविंद सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे, हितेंद्र ठाकूर, हरिश्चंद्र ठाकूर, सदाभाऊ कदम आदी वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज मान्यवर मंडळी तसेच ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांनी सोमवारी (दि.1) पेझारी येथील पाटील यांच्या घरी जाऊन पाटील कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी शेकाप नेते आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड.ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील, शैला पाटील, नृपाल पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील या पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले.








