जीर्ण साकवांचा पावसाळ्यात धोका

| उरण । वार्ताहर ।

उरण शहराला जोडणार्‍या उरण-बोकडविरा फाटा रस्त्यावरील जीर्ण झालेल्या दोन साकवाच काम हे अनेक महिन्यापासून रेंगाळत पडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जीर्ण झालेले साकव अवजड वाहनांच्या रेलचेलीत पडले तर अपघात होऊन जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरण-बोकडविरा फाटा उरण शहराला जोडणारा दुवा म्हणून अनेक प्रवासी नागरिक, चाकरमानी हे या रस्त्याकडे बघत आहेत. सदर रस्त्याजवळ नवीमुंबई ते उरण या महत्त्वाच्या उरण रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्वास आले असून सर्रास प्रवासी नागरिक, चाकरमानी हे याच रस्त्याचा वापर रहदारीसाठी करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या दुष्टीनी महत्वाच्या असलेल्या उरण ते बोकडविरा फाटा या रस्त्यावरील जीर्ण झालेल्या दोन साकवाच नव्याने काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी मागील महिन्यात हाती घेतले होते. या जीर्ण झालेल्या साकवा वरुन वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर दोन साकवाच काम लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version