स्मशानभुमीचा रस्ता खचला

6 महिने होवूनही दुर्लक्ष्य, ग्रामस्थांची नाराजी

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

ग्रुप ग्रामपंचायत माजगांव हद्दितील असलेली आंबिवली येथिल स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे अंतिम संस्काराला जाण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी पावसाचा छोटा ओढा असून, डोंगरातून येणारे पाणी या ठिकाणी येत असल्यामुळे पावसाळी जागा ओळसर होवून मोरी खचली गेले सहा महिन्यापासून या ठिकाणी रस्ता खचला असून ह्या कडे सातत्याने दुर्लक्ष्य होत असल्यांचे निदर्शन येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

पावसामुळे तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली असून, काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे, पडल्यांचे निदर्शनास येत आहे. सदर आश्या घटना संबधित अधिकारी, ग्रामपंचायत या कडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यांचे निदर्शनास येत आहे. आंबिवली येथे ओढ्याच्या ठिकाणी ही स्मशानभुमी असून सावरोली – खारपाडा रस्त्यालगत असून थोडे अंतर चालावे लागते. सदर याच ठिकाणी रस्ता खचल्यामुळे अंतिम संस्कारासाठी लागणारे लाकडे वाहून नेण्यांची वेळ ग्रामस्थ यांच्यावर आली आहे.

ह्या स्मशानभुमी जवळ वहान जात होती. मात्र रस्ता खचल्यामुळे कोणतेही सामान जात नसून या साठी शारीरिक श्रम करावे लागत आहे. सदर ह्या ठिकाणी मोरी खचून खड्डा पडला असून, तातडीने या ठिकाणी उपाय योजना करावी अशी मागणी सध्या ग्रामस्थ करीत आहे.

आंबिवली येथिल स्मशान भुमी कडे जाण्यासाठी रस्ता खचला असून या संदर्भात आम्ही लवकरात - लवकर यांचे काम हाती घेवून रस्ता पुर्वरत करणार आहोत
दिपाली नरेश पाटील
गृप ग्राम पंचायत सरपंच माजगांव
Exit mobile version