। रसायनी । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या शहर अध्यक्षपदी दिलीप शंकरराव कदम यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिलीप शंकरराव कदम हे पनवेल महानगर पालिकाचे सेवा निवृत्त अधिकारी आहेत. ते सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्त असून अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे सल्लागार पदावर आहेत. कोयना क्षत्रिय मराठा समाज संघांचे माजी सरचिटणीस व माजी अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. सद्या ते दि-पनवेल को. ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक आहेत. तसेच, शेतकरी कामगार पक्षाचे ते निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते असून पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहे. पक्षात निष्ठेने काम केल्याने त्यांना पक्षाने न्याय दिला आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले.







