| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 18 मध्ये शेकाप व महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. शेकाप व महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप कदम यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रचाराने वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाणारे नेतृत्व म्हणून दिलीप शंकरराव कदम यांची प्रभागात ओळख आहे. प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या संघटित ताकतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजेमुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये दिलीप शंकरराव कदम यांचे पारडे जड दिसत आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असलेले दिलीप कदम हे या निवडणुकीत विजय संपादन करतील असा विश्वास पदाधिकारी, मतदार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रचारादरम्यान दिलीप कदम यांचे मतदारांनी मनापासून स्वागत केले. आणि विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिले.







