अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची बदली करण्यात आली असून जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार दीपक कपूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नवनियुक्त महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. यावेळी संचालक गणेश रामदासी यांनी त्यांचे स्वागत केले.





