| खोपोली | प्रतिनिधी |
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावने गावातील दिनेश तुकाराम दळवी (42) रविवारी (दि.21) सकाळी साडेआठ वाजता पनवेलमधील येथील घरातून दुकानावर जातो असे सांगून निघून गेलेले आहेत, ते अद्यापपर्यंत घरी आले नसल्याने दळवी यांच्या कुटूंबाने रसायनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. दिनेश दळवी यांच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पोलीस हवालदार प्रांजली पाटील (8793792671) यांच्याकडे संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.






