थेट सरपंच निवड कळीचा मुद्दा

| पेण | प्रतिनिधी |

गेल्या 10 वर्षापासून नवीन नियमानुसार थेट सरपंचाची निवडणूक हा कळीचा मुद्दा झाला आहे. पेण तालुक्यात 11 ग्रामपंचायती असून यामध्ये बोरगाव, बेवलडे बुद्रुक, वरवणे, वडखळ, वाशी, दिव, तरणखोप, बळवली, दुष्मी, बोरी महालमिरा डोंगर अदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 11 पैकी 8 ठिकाणी या महिला सरपंच असतील. यामध्ये बोरगाव अनुसुचित जमाती महिला, वडखळ सर्वसाधारण महिला, दिव सर्वसाधारण महिला, तरणखोप सर्वसाधारण महिला, बळवली सर्वसाधारण महिला, दुष्मी ना.मा.प्र महिला, बोरी सर्वसाधारण महिला, महालमिरा डोंगर ना.मा.प्र महिला तर बेलवडे बुद्रुक व वाशी सर्वसाधारण तर वरवणे अनुसुचित जामाती खुला असे सरपंचांचे आरक्षण आहे यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु, थेट सरपंचाचा अडथळा सर्व ठिकाणी येत आहे पहिले कोण? या मुद्द्यावर बोलणी फिस्कटली जात आहेत.

पेण तालुक्यातील भाजपच्या नेते एक झाले असलेतरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले दिसत नाही. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्ते आपले राजकीय अस्तित्व नेत्यासाठी सोडायला तयार नाहीत. त्यातच शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादीचे दोन गट, काँग्रेस गणतीतच नाही. शेकापक्षाची धुरा निलकंठ दिवेकर हे योग्यप्रकारे सावरत असल्याने इतर राजकीय पक्षांना शेकापक्षाची गरज भासणार आहे. परंतु, थेट सरपंच निवडणूक असल्याने सरपंचाची संगीत खुर्ची करता येत नाही. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये हेवेदावे वाढलेले आहेत. 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल एवढे नक्की. नव्या जुन्याच्या वादात आणि पहिले कोण ? नंतर कोण ? या गुंतागुंतीत पेणचे राजकारण ढवळून निघाले आहे.

Exit mobile version