नांदाईपाडा येथे डायरेक्ट व्हॉलिबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा

पेणला अंतिम विजेतेपद तर बोरपाडा संघ उपविजेता

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील झिराड परिसरातील फकिरपाडा-नांदाईपाडा येथे रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन आणि जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली डायरेक्ट व्हॉलीबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा 2026-2027 मोठ्या उत्साहात पार पडली. पुरूष व महिला गटासाठी आयोजित या स्पर्धेला जिल्हाभरातून खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पेण संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम विजेतेपद पटकावले, बोरपाडा संघ उपविजेता ठरला, अलिबाग संघाने तृतिय क्रमांक मिळविला. यजमान फकिरपाडा संघाने चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. यावेळी डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशन महाराष्ट्र व डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनचे रायगडचे जनरल सेक्रेटरी दिपक मोकल, यतिराज पाटील, आशिष पाटील, प्रसन्ना पाटील, गणेश भोईर यांचे हस्ते घेण्यात आला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रूपये 10 हजार व भव्य चषक, द्वितीय क्रमांकास रूपये 7 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 3 हजार व भव्य चषक तसेच चतुर्थ क्रमांकास रूपय 3 हजार व भव्य चषक, अशी पारितोषिके मान्यवर उपस्थितांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

Exit mobile version