उद्या श्रीवर्धन येथे दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| अलिबाग | प्रतिनिधी |

दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाने तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात उद्या मंगळवार, दि. 23 डिसेंबर रोजी हे शिबीर होणार आहे. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. तरी, या शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालय वैद्यकीय विभाग समाजसेवा अधीक्षक विशाल भार्दुगे यांनी केले आहे. या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी, संबंधित दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. भार्दुगे यांनी केले आहे.

Exit mobile version