| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दिव्यांग संघटनेने माजी आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला जाहिर पाठिंबा दर्शवत शुक्रवारी (दि.13) तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू हे विविध मागण्यांकरीता दि.8 जून पासून अमरावती येथील गुरुकुंज मोझारी येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दर्शविण्याकरिता उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना व दिव्यांग बांधवांतर्फे उरणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार उद्धव कदम यांना त्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सदस्यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचा अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा आहे. तसेच, यापुढे मागण्यांसंदर्भात अनुकूल चर्चा नाही झाली तर उरण तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव उपोषणाला बसतील, असे देखील त्यांनी सांगितले.






